लिहिलेले अक्षर मेले
शक्याशक्यांच्या राखेखाली पुरले
तापल्या धुळीचे केवळ
कोरड्या नभाशी अक्षय नाते उरले!
-----------------------
अडकवा फास शब्दांचे
अन् ठार मरेतो घोटा गळे व्यथांचे
झाल्यावर लिहून कवने
मोडतोस का रे टोक तुझ्या टाकाचे?
-----------------------
हे पहा कवीचे थडगे
गातांना फुलवायाचा इंद्रधनुष्ये
अन् आसपास पुरलेली
पाळीव व्यथांची पोकळ दीर्घायुष्ये!
2 comments:
mastch! :-)
जगाच्या या राम रगाड्यात,
मधूनच मन सुखावून टाकणारा
हा पारिजातकाचा मंद दरवळ
असाच रसिक मने सुगंधित
करीत रहावो.
शशांक
Post a Comment