उगा ठरवायचे की देव असतो, हा असा दिसतो
असे वागा, तसे वागू नका म्हणजेच सापडतो
तुझ्यामाझ्यात तो आहे म्हणत घडवायच्या मूर्ती
वहीतिल पापपुण्याच्या जरा बदलायच्या नोंदी
---
अरे, नाहीतरी सारेच वाळूचेच हे इमले
उद्या जे ढासळायाचेच होते, आज ढासळले!
कुठे आयुष्यभर टिकतो कधी आनंद कसलाही?
खरी गंमत अशी, हे दुःखही टिकण्यातले नाही
---
तुला जर छंद आहे नागमोडी पायवाटांचा
कशाला व्यर्थ कांगावा विषाचा आणि दंशांचा?
नकाशे पाळुनीसुद्धा जिथे हरवायला होते
दिशांना देउनी हुलकावण्याही चालता येते!
---
5 comments:
mast!!
"तुला जर छंद आहे नागमोडी पायवाटांचा
कशाला व्यर्थ कांगावा विषाचा आणि दंशांचा?..."
बहोत ख़ूब!
>>तुला जर छंद आहे नागमोडी पायवाटांचा
>>कशाला व्यर्थ कांगावा विषाचा आणि दंशांचा?
क्या बात हैं!!
Swati, kavita phaar aavaDalee.
tujha kavita-sangrah miLoo shakel kaa ?
Swati, kavita phaar aavaDalee.
tujhaa kavita-sangrah available aahe kaa online ?
Post a Comment