Thursday, January 8, 2009

ध्यास

तुझ्या वाटा मनःस्वी आणि वळणे आततायी
धुळीतुन पावलांचा माग मी शोधीत आले
तुला मंजूर नाही थांबणे एक्याच ठायी
दिशांचे उंबरे म्हणुनीच ओलांडीत आले

तुझी भाषा निराळी, अर्थ मौनांचे निराळे
सुरांवरतीच माझ्या नेणिवा नादावलेल्या
तुझे शून्यात आशय पेरणारे खोल डोळे
मला दीप्तीच दिसती त्यांतल्या तेजाळलेल्या

तुझ्यामाझ्यात आता फक्त स्पर्शाचेच अंतर
कधी वाटे उठावे अन् करावे पार ते ही
पुन्हा भय वाटते.. स्पर्शास आकळलास तू तर..?
कशाचा ध्यास आयुष्यास मग उरणार नाही..!!

7 comments:

Anand Sarolkar said...

Wah! Kya baat hai.

Kay punch ahe last line madhe!

Anonymous said...

"तुझे शून्यात आशय पेरणारे खोल डोळे"...
फार सुंदर...

Gayatri said...

Sundar !!

Shrikant said...

swati,

Bandudada ani Rashmivahini,

Sundar kavita ahe !!!

Manjiri said...

स्वाती,

फार छान लिहितेस! सातत्याने आणि सुरेख!
कसा काय पण तुझं लिखाण मला सापडलं नव्हतं.
खरं तर तुझा शेवटचा लेख पार भिडलाय, पण तो अशी टीप लिहायचा लेख नाही. ती जखम भळभळणारी तिथे फक्त डोळे टिपु शकते.
सुंदर. लवकर अजुन लिही.

eksakhee said...

khupach mast

Anonymous said...

keep it up :)