मिनोतीने दिलेला खो पुढे चालवत आहे..
कविता हा इतका जिव्हाळ्याचा विषय आहे, की संवेदचा 'सद्ध्या आवडलेल्या दोन' हा पोटनियमसुद्धा जाचक वाटावा. :)
असो. तर आधी नियम :
१. कविता आवडते पण पूर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र अवश्य लिहा
२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)
३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद अवश्य करा
४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण अपेक्षित नाही
५. अजून नियम नाहीत :)
आणि आता कविता :
१. वाट - ग्रेस
तू येशील म्हणून मी वाट पाहत आहे
ती ही अश्या कातरवेळी
उदाच्या नादलहरीसारख्या संधिप्रकाशात..
माझी सर्व कंपने इवल्याश्या ओंजळीत जमा होतात
अश्या वेळी वाटेकडे पाहणे
सर्व आयुष्य पाठीशी बांधून
एका सूक्ष्म लकेरीत तरंगत जाणे
जसे काळोखातही ऐकू यावे
दूरच्या झर्याचे वाहणे..
मी पाहतो झाडांकडे.. पहाडांकडे..
तू येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती
एक नसलेली पणती लावून देतो..
आणि आई नसलेल्या पोरासारखे
हे माझे शहाणे डोळे
हलकेच सोडून देतो नदीच्या प्रवाहात..
तू येशील म्हणून.. मी वाट पाहत आहे..
२. हव्या हव्या क्षणासही - सुरेश भट
असाच हा गिळायचा गळ्यामधील हुंदका
कसेबसे तगायचे धरून धीर पोरका
अशीच येथली दया हवेत चाचपायची
अशीच जीवनास ह्या पुन्हा क्षमा करायची
असेच पेटपेटुनी पुन्हा पुन्हा विझायचे
हव्या हव्या क्षणासही नको नको म्हणायचे..
माझा खो ट्युलिप आणि गायत्रीला.
5 comments:
"तू येशील म्हणून अज्ञाताच्या पारावरती
एक नसलेली पणती लावून देतो..
आणि आई नसलेल्या पोरासारखे
हे माझे शहाणे डोळे
हलकेच सोडून देतो नदीच्या प्रवाहात..."
भो माणिक, तुज सगुण म्हणू की निर्गुण रे???
सु sss रे sss ख
मराठी साहित्याच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आपणास व आपल्या कुटुंबियांना सुख समाधानाची आणि भरभराटिची जावो!
दिवाळी निमित्य हार्दिक-हार्दिक शुभेच्छा!
आपला,
अनिरुद्ध देवधर
mastacha ga.
asech he kase base....
kase tari jagayche...!!
ashi suruwat ahe guru yaa gazalechi..
gaana aikayla pan khup shravaniy aahe.
mala ek ch stanza mahit hota.
tuzya mule baki pan kalale.
thanku :)
Post a Comment