Friday, March 14, 2008

अद्वैत

आणि अखेर
वर्षानुवर्षांची वेडी वाटचाल संपून
तो मंदिराच्या गाभार्‍यापर्यंत पोचतो
तोवर त्याला ज्ञात असलेलं जग
अंधारात विरून गेलेलं असतं
जन्मापासून छळत आलेल्या त्या एकाच प्रश्नाची ठिणगी
मूर्तीपुढच्या मिणमिणत्या ज्योतीला आव्हान देऊ लागते
स्वतःचाच भार असह्य होऊन भुईवर कोसळताना
सारी उरली सुरली शक्ती एकवटून
तो टाहो फोडतो..
'एकदा सांग.. तू खरंच आहेस का?'

उत्तराऐवजी
नुसतेच निनादत राहतात त्याच प्रश्नाचे शेकडो प्रतिध्वनी..
'तू खरंच आहेस का?'
'तू खरंच आहेस का??'

अन् बघता बघता त्याचे डोळे
समोरच्या मूर्तीइतकेच निर्विकार होत जातात..

12 comments:

सर्किट said...

सुरेख!

पण जरा लगेच संपली असं वाटलं. म्हणजे शेवटच्या ओळीआधी अजून एक कडवं/परिच्छेद हवा होता - असं काहीसं?

HAREKRISHNAJI said...

अंतर्मुख करायला लावणारी कविता.

'तू खरंच आहेस का??'
उत्तर मिळणे कठीणच आहे

Sneha said...

kaahi prashnaanaa uttar nasataatach bahutek mag tyana prashn mhanayache ki naa? te nakki kaay? ek chaL?

blog khup chaan aahe

Vibhavari said...

khup ch surekh

Nandan said...

surekh kavita...atishay aavadali. di. ba. mokashinchya 'aata aamod sunasi aale' ya kathechi aathavan zali.

वैभव जोशी said...

अप्रतिम

Kamini Phadnis Kembhavi said...

वा वा..

पूनम छत्रे said...

जबरदस्त कविता!

पण ही आधी वाचली आहे असं वाटतंय.. ब्लॉग सुरु केलास तेव्हा ही होती का हेडरला किंवा अशीच कुठे?

स्वाती आंबोळे said...

अभिप्रायांसाठी सर्वांची आभारी आहे.
पूनम, ही मायबोलीवर पोस्ट केली होती पूर्वी.

सर्किट, पण मला इतकंच म्हणायचं आहे. :)
तो, ज्याच्याविषयी प्रश्न पडला आहे ते, आणि खुद्द प्रश्न - या सगळ्यांचंच अस्तित्व एकमेकांवरच अवलंबून आहे एका अर्थी - म्हणून अद्वैत..

Vidya Bhutkar said...

Kiti divasaani kahi tari vachayla milala tujha. Kavita avadali,Khupach chaan. Pan shevat vaacheparyant bhiti vatli 'kharach asa jhala tar?'....
Please keep writing more frequently.
-Vidya

Anonymous said...

swatiet ,Jeevanaat n sutalele code kavitet pragat kele aahe.
kavita khup chaan aahe.

Meenakshi Hardikar said...

tu ashich lihit raha. agadi tula padanari kodi suddha.