Thursday, October 4, 2007

जे जे उत्तम..

"पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. "

विद्याने (http://vidyabhutkar.blogspot.com/) या उपक्रमासाठी टॅग केल्यावर प्रथम वाटलं की अशी एका उता-याची निवड करणं ही जवळपास अशक्य कोटीतली गोष्ट आहे. काही पुस्तकं आवडतात.. काही तर चक्क जिवाभावाची दोस्त होतात.. हे 'मैत्र' सुदैवाने खूप लाभलं आहे मला. आता त्यातून एक वेचा निवडायचा म्हणजे कठीण काम. तरी माझ्या एका लाडक्या पुस्तकातला आवडता उतारा देत आहे :

मुंबईच्या कोलाहलातून बाहेर पडला आहेस. हिमालयाच्या उत्तुंग हिमधवल शिखरांच्या सावलीत शांतपणे बसून कधीतरी स्वतःलाच विचार, "मी कश्याकरता जगतो आहे? ह्या जीवनापासून माझी काय अपेक्षा आहे? असं काय आहे की जे मला काहीही झालं तरी मिळवायचंच आहे? आणि त्यापलिकडे असं काय आहे की ज्याकरता मी नोकरी, ही प्रतिष्ठा, फार काय हे जीवनदेखील झुगारून देईन?"
हे एकदा स्वतःच्या मनाशी ठरले तर एका बाजूने हा रस्ता बांधण्यासाठी दिवसरात्र परिश्रम करायचे आणि दुस-या बाजूने मात्र सुरुंग लावून तो उडवून द्यावा असे वाटत राहायचे ही तुझी द्विधा मनःस्थिती संपेल. एका बाजूला सैन्यातली शिस्त आणि दुस-या बाजूला ह्या शिस्तीत न बसणारी पण मनोमनी पटलेल्या स्वतःच्या कर्तव्याची जाणीव ह्यांतून तुझ्या मनात निर्माण होणारा संघर्ष थांबेल.
स्वतःशीच प्रामाणिक राहण्याला आणि आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला पटलेल्या रस्त्याने जाण्याला विलक्षण धैर्य लागते. ते तुला लाभो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना.


पुस्तक : रारंगढांग
लेखक : प्रभाकर पेंढारकर



आता मी टॅग करायचं, नाही का?
१. ट्युलिप (http://tulipsintwilight.blogspot.com/)
२. विनायक (http://shabdankit.blogspot.com/)
३. प्रशांत (http://upasanip.blogspot.com/)
४. मिनोती (http://minoti.kundargi.googlepages.com/)
५. पूनम (http://kathapournima.blogspot.com/)

8 comments:

Meghana Bhuskute said...

सुरेख निवड. मी फारच प्रयत्नांनी हा उतारा बाजूला ठेवला, म्हणून माझ्याकडून स्पेशल थॅंक्स!

सर्किट said...

chhan pustakatun chhan utara nivadala aahe. rarangdhang punha ekada vachalach pahije. blog chi template pan akarshak aahe.

Anonymous said...

स्वतःशीच प्रामाणिक राहण्याला आणि आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला पटलेल्या रस्त्याने जाण्याला विलक्षण धैर्य लागते. ते तुला लाभो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना.


hee praarthana khup aavaDali.

Anonymous said...

पुन:प्रत्ययाचा आनंद दिला! धन्स!! :-)

‘उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असे म्हणतात. म्हणूनच तुमच्या ब्लागावर नेहमी समृद्ध साहित्य वाचायला मिळते.

हा ट्यागिंग गेम काय आहे ते कळेल काय अडाण्यास? ’मामाचं पत्र हरवल' ष्टैल काहीसा खेळाचा प्रकार आहे का?

TheKing said...

Being honest to yourself, no doubt is the toughest thing to achieve. Those who manage touch the skies, rest.. we have enough population otherwise :-)

HAREKRISHNAJI said...

मी हे पुस्त्क वाचले आहे. सुरेख निवड

नीरजा पटवर्धन said...

he marathit sagalach page kasa jamavalas? ata savakashine vachin. blog prakarat mi ajun preschool madhech aahe..

Dk said...

खरच ग्रेट आहे हे पुस्तक सह्हीच आहे!