Friday, December 28, 2007

अपरिहार्य

सिनेमा संपावा तसा संपलाय आणखी एक चॅप्टर
सहजपणे आणि अपरिहार्यपणे.

मघाशीच ना या इथेच आली होती
कोणावर तरी जीवनमरणाची आणीबाणी?
ते प्रेम, ती चीड, तो त्याग, ते शौर्य,
ते हसू, ते आसू, ते विनोद, ती गाणी..?
बघून दिपणारे दिपले होते
कोणी हळूच डोळेही टिपले होते
रंगला होता खेळ!

पण आता लक्षात येतंय, त्यातला एकही रंग
पडद्याने मनाला लावून घेतलेला नाही
मघाशी त्याला हादरवणारे आवाज आता सरलेत
प्रतिध्वनीसुद्धा विरलेत
हा सन्नाटा, हा काळोख, या रिकाम्या खुर्च्या
हेच अंतिम सत्य आहे हे पडद्याला एव्हाना कळलंय

- सहजपणे, आणि अपरिहार्यपणे.

11 comments:

Kamini Phadnis Kembhavi said...

त्यातला एकही रंग
पडद्याने मनाला लावून घेतलेला नाही>>>

हेच अंतिम सत्य आहे हे पडद्याला एव्हाना कळलंय>>

सुर्रेsssssख

पण सन्नाटा??? तुझ्या कवितांमधे असे शब्द बघितले नाहित, म्हणुन हा प्रश्न पडला.

A woman from India said...

छान.

Anonymous said...

kyaa baat hai! khoop chhaan.

ek chapter sampalaa tasaa naveen chapter suru paN jhaalaa aahe :P
Happy new year!

Anonymous said...

kya baat hai!!

Abhijit Dharmadhikari said...

"sahajpaNe aaNi apariharyapaNe..."

ekdam khaas!

सर्किट said...

ohho, year-end cha sandarbh hota kaay kavitela. comments vachalyavar kaLala. chhaanach zaliye kavita. :-)

a Sane man said...

farach chhan - "sahajapne aaNi apariharyapaNe" he vishesh aawaDala.

@Cirsuit: KaThinach aahes!

Anonymous said...

hummm kharaya ga. kiti khara.

Meenu

Pooja said...

aahh
sahjpane n apariharyapane...
ashkya bhari!!!

नचिकेत जोशी said...

Swati Tai..
lay bhari....
"sahajapane ani apriharyapane.."

नचिकेत जोशी said...

Swati taI...
sundar..... lay bhari
sahajpane ani apiharyapane...

"त्यातला एकही रंग
पडद्याने मनाला लावून घेतलेला नाही"...
khallas....