Wednesday, January 23, 2008

जागृत

तुझा दोष नाही.
मी तुला शेंदूर फासला तो
मला काहीतरी चाळा हवा होता,
तुझ्या मंजूरीचा प्रश्न नव्हता,
आणि शेंदूर स्वस्त होता म्हणून.
आणि नंतर तो पुसला नाही, कारण
बरेच लोक डोकं टेकवताना दिसले
तेव्हा आपला दगडाचा चॉईस एकूण बरा असावा
याचं समाधान वाटलं म्हणून.
त्यांच्या मागण्या पूर्ण करता येत नाहीत
म्हणून चिडचीड करण्याइतका तू 'जागृत' होशील
ही शक्यता तेव्हा ध्यानातच आली नाही!!!

16 अभिप्राय:

Anonymous said...

aaishappat!
jaagrut paNaachee chiDachiD sollid aahe haM. atishay gaMbheer lihile aahes. aavaDalee.

a Sane man said...

too good!

Meghana Bhuskute said...

jabara!

kasakaay said...

अगदी खरंय! नेहेमीप्रमाणेच कविता छान आहे.

पूनम छत्रे said...

jabari!

HAREKRISHNAJI said...

असाच मुर्तीला फासलेला शॆदुराचा लेप एकदा गळुन पडला. ज्याला मारुतीची मुर्ती समजत होते तो गणपती निघाला.

Abhijit Dharmadhikari said...

"मला काहीतरी चाळा हवा होता,
तुझ्या मंजूरीचा प्रश्न नव्हता"...

नेहमीचं जगताना हे सत्य ब-याचदा स्वत:मध्येपण जाणवतं!

मस्त लिहीलय!

Nandan said...

class!

Sanghamitra said...

surekh lihiles swAtI. mAgache vAchatey haLUhaLU. tujhI bhAShAch jAdUI Ahe.
-Sanghamitraa

meenu said...

mastacha ga swati. khup divasani ala na ki ajunacha bhidata tuza likhana.

Meenu

सर्किट said...

khallaas. :)

"chiDchiD hoNyaitapat jaagrUt" aNi ti chiDchiD vhayacha kaaraN solid ahe ekdum!

Prashant Upasani said...

मस्तच स्वाती.. नास्तिक आठवली संदीपची..

Jaswandi said...

sahich!

<--sahdeV-- said...

sandeep kharenchi Nastik Kavita athavali.

Doghaanchi tulana hou shakat nahi, pan this one is... really, a good one!!!

Nile said...

hmmm... chan ahe.

Asavari said...

hi kavita khupach awadli. tyachyatla satya mazyaitka kunala kalnar?