Wednesday, February 14, 2007

भाषांतर

त्याला खरंतर म्हणायचं होतं,
"प्रिये, माझं कित्ती प्रेम आहे तुझ्यावर..!"
पण म्हणताना मात्र तो म्हणाला,
"हा काय ड्रेस घातलायस आज!!"
आणि गंमत म्हणजे तरीही तिला
ते न म्हटलेलं वाक्यच ऐकू आलं
कारण परवाच तिनेही नाही का
"ए, तू मला कित्ती रे आवडतोस"चं 'भाषांतर'
"मी मुळी आता बोलणारच नाहीये तुझ्याशी..!!"
असं केलं होतं...!



Happy Valentine's Day !!

8 comments:

पूनम छत्रे said...

hehe, kaay cute bhaashaa aahe yaanchi.. mast :)

वैभव जोशी said...

मस्त कविता...

पण हे कळणार कसं? असं भाषांतराचं पुस्तक उपलब्ध आहे का? :-)

Meenakshi Hardikar said...

ही तुझी कविता माझी अगदी अगदी आवडती आहे. खुपच गोड ....
वैभव तुला रे कशाला हवय असलं तसं पुस्तक तरी ? ;)

HAREKRISHNAJI said...

was it much before marriage ? After marriage one may sometimes needs translator.

Ha, just joking.

Nice poem as usal.

जयश्री said...

स्वाती... खरंच खूप खूप गोड कविता आहे :)

सहज said...

ek sher aathavala...

nigahe kah deti hai dil ka haal Majboor.
Our chipane ko de di hai JabaN usne.

चित्तरंजन भट said...

लाडिक, लाघवी प्रेमकविता आहे. "कित्तीकित्ती" आवडली. महाविद्यालयीन वाचकांत भलतीच लोकप्रिय होऊ शकते.

Dk said...

हा हा हा म स्त च आहे ही प्रेमाची कविता