Wednesday, February 23, 2011

दया

पुन्हा सांज झाली, तुझ्या आठवांनी कडाडून चावा पुन्हा घेतला
पुन्हा रात्र काळीनिळी झोंबणारी पुन्हा तोच जल्लोष रक्तातला

पुन्हा पावलांतून काटा निघावा तसे मार्ग कक्षेतले लोपले
पुन्हा बेहिशोबी दिशेला नव्याने तुला शोधण्या स्वप्न झेपावले

पुन्हा पिंजले अंतराळातले खोल गंधार, धुंडाळल्या चाहुली
नशा जीवघेणी निराशेतली अंतरा अंतराने पुन्हा चाखली

अकस्मात फुटले नभी तांबडे.. चेतलेल्या उन्हाने फणा काढला
पुन्हा पेटले अद्‌भुताचे किनारे.. धगीने पिसारा पुन्हा जाळला!

पुन्हा तीच माती.. पुन्हा त्याच वाटा.. पुन्हा त्याच पायांतल्या साखळ्या..
पुन्हा ती उदासीन शरणागती आणि साक्षीस निर्ढावल्या सावल्या!

पुन्हा लादला सूर्य पाठीवरी अन्‌ पुन्हा निग्रहाने दिवस लोटला
दया येउनी शेवटी आठवांनी कडाडून चावा पुन्हा घेतला....!!

15 comments:

सारंग पतकी said...

Khup chhan!

Dr.Shantanu Chindhade said...

Namaskar Swatiji,
This is excellent poem.You have handled the Vritta very skillfully.Imagery is fine and the pathos catches the mind so well.,
Keep that up
Did you see Shabda vaibhav Blog,
Regards,
Shantanu Chindhade,Pune INDIA

Mints! said...

avaDali!

eksakhee said...

mast

Sthiti Chitra said...

sundar... shabdach nahit pratisadala...

नचिकेत जोशी said...

taai!!!
sundar kavita!!
abhinandan...

Naynish said...

You have expressed the "pining" really well. Its got a haunting effect too. Great!

सुशांत said...

दृश्यसुचक समर्पक शब्दप्रतिमा आणि एक सुरेख सलग...तुटक आणि शेवटाने सुरवात जोडणारी ओळीन्ची लयबद्धता या कारणानी ही कविता हृदयस्पर्शी झालेली आहे.वाचकांना भावते आहे. "नशा जीवघेणी निराशेतली अंतरा अंतराने पुन्हा चाखली" हीच गोष्ट तुमच्या कवितेच्या बाबतीत ही होते आहे. मी ही कविता वाचल्यापासून परत परत येउन तिला पुन्हा वाचतो. अप्रतिम रचना लिहिल्याबद्दल अभिनन्दन आणि वाचानानंदाबद्दल धन्यवाद

Pooja Doke (Rutuved) said...

vaah...dhagdhagati at the same time gar karnari kavita...surekh!!

विशाखा said...

अगदी भिडणारी आणि अस्वस्थ करणारी गझल! अप्रतीम लिहिलंय! सगळा ब्लॉग वाचते आता...

Bharati Birje Diggikar said...

a classic thruout..mindblowing images. thoroughly impressed. Best wishes..

Bharati Birje Diggikar said...

a classic thruout..mindblowing images. thoroughly impressed. Best wishes..

Bharati Birje Diggikar said...

Great work.. so genuine. a complete classic.

कल्पेश पाटील said...

अप्रतिम.. वेदनेचे हृदयस्पर्शी चित्रण..

Rahul Kaware said...

sundar...
pan kavita juni ahe...
navin post kara, tumchya lekhanichya soundaryacha nava avishkar baghnyas utsuk ahot...
dhanyavad!

- rahulkawarekavita.blogspot.com