Sunday, March 25, 2007

काजळी

सकाळचीच ना गोष्ट आहे..
बोललेल्या शब्दांच्या हिरव्यागार पानांआडून
डोकवत होते न बोललेल्याचे हसरे कवडसे..

आता पहाते तर..
शब्दांना पडल्ये जाळी
आणि अर्थांनाही धरल्ये काजळी..

दिवसभरात
हे इतकं सगळं घडलं??

14 comments:

  1. काजळी... मस्त उतरलिये !

    ReplyDelete
  2. na bolalyache kavadase misinterpret zale tar asa hou shakel...kadachit ekach divasat...chaan...

    ReplyDelete
  3. अहा.......किती सुरेख!
    पण अर्थांना काजळी धरलीये... हे negative आहे कां गं?

    ReplyDelete
  4. जयू,
    हो, negative च आहे गं. (मी negative च लिहीते का फार?) :)
    शब्दांतला 'जीवनरस' संपला आहे.. आणि तो ज्याच्यामुळे होता, तो उजेड मावळत चालला आहे..
    बोलायला जावं तर शब्द विरल्यासारखे वाटतात आणि अर्थ उमटतच नाहीत.. जे उमटतात त्यांचा विपर्यास होईल अशी धास्ती वाटते..
    एकूण 'संवाद' संपला आहे..
    आणि हे काही कळासवरायच्या आतच घडून गेलं असं वाटतंय.. थांबवता आलं नाही..

    अभिप्रायांसाठी सर्वांची आभारी आहे.

    ReplyDelete
  5. उशीर झाला :-)

    पण सुंदर कविता !

    ReplyDelete
  6. swaatee, su.ndar!
    shabdaaMnaa jaaLee an, arthaaMnaa kaajaLee...
    apratim!

    ReplyDelete
  7. khoop awadali.... "raincoat" pahilay ka?

    ReplyDelete
  8. khoop awadali...... "raincoat"pahilay ka?

    ReplyDelete