Thursday, January 4, 2007

वीज

आभाळात क्षणभर
जशी लकाकते वीज
तसे मनात रुजावे
नव्या कवितेचे बीज

नाहीतरी रोजचेच
आहे मेंढराचे जिणे
वीतभर पोटासाठी
लक्ष ओझी बाळगणे

जेव्हा प्राण हे जातील
गूढ अंधारी विरून
मागे तेवढा उरावा
एक झळाळता क्षण...

5 comments:

  1. जेव्हा प्राण हे जातील
    गूढ अंधारी विरून
    मागे तेवढा उरावा
    एक झळाळता क्षण.

    क्या बात !!!

    ReplyDelete
  2. चि.त्र्यं.खानोलकरांच्या (आरती प्रभू) कविता फार वाचल्यास का हल्ली? पण वाचायला खूप छान वाटलं. अर्घ्य ची संकल्पना छान आहे.

    ReplyDelete
  3. वाह...
    धन्यवाद गुर्जी, आमंत्रणाबद्दल आणि एवढ्या छान कवितेबद्दल, खरच फार गरज होती आत्ता काहीतरी छान वाचायची

    ReplyDelete