Thursday, May 17, 2007

Mother's Day निमित्त

अजून किती दिवस राहिलेत असे?
हे काही थांबवता येत नाही..
आज नाही उद्या मोठा होणारच आहे तो!
मग काही असा येताजाता गळ्यात पडणार नाही
नुसती मित्रांसमोर लाडक्या नावाने हाक मारली तरी चिडेल कदाचित!

अजून किती दिवस खरं वाटेल त्याला
की मी आंघोळ घालेन त्या दिवशी तो गोरापान होतो
आणि माझ्या कुशीत झोपलं तरंच वाईट स्वप्नं पडत नाहीत..

अजून किती दिवस
'मी आहे ना सोन्या?' या एका प्रश्नात
त्याला सापडतील त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं..

अजून किती दिवस सांगेल त्याच्या दिवसभरातल्या गमतीजमती?
अजून किती दिवस ऐकेल माझ्या?

अजून किती दिवस आपली उंची जोखेल माझ्याशी तुलना करून?
उद्या त्याच्याकडे बघताना माझी मान उंचावेल
याची खात्रीच आहे मला..
पण अजून किती दिवस
माझ्याकडे बघताना त्याची मान उंचावेल..???

19 comments:

Mints! said...

Very good :)

कोहम said...

वाह! फारच छान. शेवटच्या ओळी विशेष.

Anand Sarolkar said...

mast ahe!

Sthiti Chitra said...

सुंदर!

Meenakshi Hardikar said...

अहा स्वाती ब्लॉग छानच दिसतोय गं..!!
आणि हो या कवितेची शेवटची ओळ मस्त..!!

Anand Sarolkar said...

Beatiful template!

Tulip said...

swati surekh lihilayas! ekdam avaDal. blog hi cute jhalay.

Anonymous said...

"पण अजून किती दिवस
माझ्याकडे बघताना त्याची मान उंचावेल..???"


...एकदम खास!:-)

अश्विनी सातव said...

मस्त ग स्वाती. अगदी पटलं. विशेषतः ते उंचीचं तर अगदी. रोजच चाललेलं असतं घरात. आणि खरच माझा मोठा तर आत्ताच माझ्या उंचीला आला आहे. शेवटची ओळ एकदम समर्पक.

माणिक जोशी said...

ब्लॉगबद्दल मीनूला अनुमओदन.. मस्त दिसतोय !
कविता.. मस्तच, एकदम खास !
शेवटच्या ओळी विशेष.

Vidya Bhutkar said...

Khup divas jhale kahi lihil nahiyes. Busy bee?
-Vidya.

Ameya said...
This comment has been removed by the author.
Ameya said...

mastach :) sonyaa dolyaasamor aalaa ekdam dolyaatlyaa niraagas bhaavaasakat :)

सारंग पतकी said...

वा!!! खास एकदम... अगदी मनाला भिडली...!

PRAKASH K. THUBE said...

वाह वाह स्वाती. मी या स्टेजमधून गेलोय. माझा मुलगा सहा फुटापेक्षा जास्त उंच झालाय. त्यामुळे मला मान उंच करून बघावे लागते.
शिवाय आताशा त्याचे अन माझे विश्व यात अन्तर पडू लागलेय. पूर्वी सारखा मोकळे पणाने बोलत नाही अन त्याचे बालपण कमी होत चाललेय..

माझा मुलगा मला ’परका’ वाटू लागलाय!!!

म्हणून हॅट्स ऑफ टू यू.....

रॉबीनहूड

Gayatri said...

Khupach sundar !
Ek aai asalyamule agadi manatala wachatoyasa watla...

Dk said...

अप्रतिम आहे हे!

तृप्ती said...

bai, sadhya maayboli band aahe tar lunch hr mahde roj tumachya sagaLyanche blogs khaNate aahe. kiti tari "kavita" mhaNun soDun dilyaa vaachaayachyaa aaNi nemakich hi vachayala ghetali. 'ajun kiti diwas...' nusatya vichaaraane poTaat khadda paDalaa aaNi DoLyaat paaNi. me ek duShTa baai aahe paN raDavalat aaj. tari bara aaju baaju koNee naaheeye.
~Cindi

कमलेश कुलकर्णी said...

masssstch...