एकूण काय,
सगळी अंधारातली वाटचाल..
पावलापुढे पाऊल टाकत राहिलं, की काहीतरी घडल्या घडवल्यासारखं वाटतं इतकंच
नाही म्हणायला मधेच चमकून जातो एखादा काजवा
किंवा अगदीच उजळलं भाग्य तर टिपूर चांदणंसुद्धा
क्षण दोन क्षण दिसल्यासारख्या वाटतात
काही आकृत्या.. काही ठसे..
क्षण दोन क्षण खरंच वाटतं, अगदी मनापासून, की आता बरंच कळलं चालण्याबद्दल
पण ठेचा लागत राहतात अधून मधून,
काटे मोडत राहतात पायांत
आकृत्या ओळखू आल्या म्हणेस्तोवर निराळ्या भासतात
तोल जाताना चाचपडणाऱ्या हातांना काहीच लागत नाही
ठशांचे माग नाहीसे होतात..
म्हणजे दिशा बदलली.. की जागा..
की ते मुळातच कधी तिथे नव्हतेच..?
आणि मग मात्र भीती वाटायला लागते
कधीतरी लख्ख उजाडेल
आणि कधीच काहीच नव्हतंच हे कळेल याची!
एकूण काय,
सगळी अंधारातली वाटचाल..
पावलापुढे पाऊल टाकत राहिलं, की काहीतरी घडल्या घडवल्यासारखं वाटतं इतकंच!
वाटंच पाहत होते मी...लिहिलंस !
ReplyDeleteनेहमीप्रमाणेच आशयपूर्णं ! एकदम पटलं.
लख्खं उजाडायचं भाग्य आपल्या नशिबी असेल तर आणखी काय हवं ?
आज फारा दिसांनी माझ्या गूगल रीडरात लख्ख उजाडलं :-)
ReplyDeleteअप्रतिम लिहिलंय! रचनेचा अर्थ गूढ आणि आध्यात्मिक वाटला.
आणि मग मात्र भीती वाटायला लागते
ReplyDeleteकधीतरी लख्ख उजाडेल
आणि कधीच काहीच नव्हतंच हे कळेल याची!
>>>>
hmmm!
kaay lihites gaM! masta!
kharaya kadhitari lakhkha ujed padel yachi bhiti vatayala lagate. ani gayatri mhanate tasa te bhagyachahi ahecha. sagalyanchya nashibi nasanara. :)
ReplyDeleteक्षण दोन क्षण खरंच वाटतं, अगदी मनापासून, की आता बरंच कळलं चालण्याबद्दल......
ReplyDeletefarach mast
Swati .
ReplyDeleteI refer to your comments on Tulip's blog "हाथ से छू के इन्हें रिश्तोंका इल्ज़ाम ना दो..
अगदी नेमका वेध घेतला आहेस या भावनेचा. पुन्हा लिहायला लागल्येस याचं खूप बरं वाटतंय. :) "
How about you ? When are you going to start writing again?
kyaa baat hai Swati... khaasach!!
ReplyDeletechalaNyaabaddal ajun kaahich naahi kaLala.. he kaLala aaj he vaachun!:) dhanyavaad!!