Tuesday, June 12, 2007

शाश्वत

हसणार कळ्या, फुलणार फुले, येणार ऋतू, जाणार ऋतू,
सजणार इथे मधुमास जरी असणार न मी, असणार न तू

उठणार सख्या वाळूवरती हलकेच पुन्हा पाऊलखुणा
संकेतस्थळी अपुल्या फिरुनी लाजून कुणी भेटेल कुणा

ती तीच पुन्हा स्वप्ने सारी रमणार नव्या डोळ्यांत जुनी
त्या तश्याच विव्हल सुरांसवे शोधीत कुणा फिरणार कुणी

ती वचने, त्या आणाभाका, ते हसणे, रुसणे, सावरणे,
ते मंतरलेले क्षण सारे, ते बावरणे, ते मोहरणे

ते तसेच सारे पुन्हा पुन्हा घडणार आपुल्या माघारी
हे शाश्वत अपुले प्रेम सख्या या अशाश्वताच्या संसारी..

11 comments:

  1. Here is the first comment. let me tell you that it is worth the wait.
    I always keep guessing what could be the next poem about and I get pleasant surprise everytime.:-D
    "ते तसेच सारे पुन्हा पुन्हा घडणार आपुल्या माघारी
    हे शाश्वत अपुले प्रेम सख्या या अशाश्वताच्या संसारी.."
    मस्तच !
    -विद्या.

    ReplyDelete
  2. फ़ारच छान! एखाद्या जुन्या कवीच्या कवितेसारखी वाटते.
    इतका सुंदर विचार आणि इतका मनोहारी आशावाद वाचून फ़ार छान वाटले!
    प्रतिभेला सीमा नसतात हेच खरे!

    लिहीत रहा.....बहरत रहा..

    अश्विनी.

    ReplyDelete
  3. अव्वल !! :-)

    ReplyDelete
  4. ही alltime fev कविता आहे माझी सेव्ह करुन ठेवलीये . चालेल ना?

    ReplyDelete
  5. kaay lihites g , tuzi kavita vachun
    mala mazyi sakhi atavali
    mast vatal,khup lihi
    tula hardik subecha

    sandeep

    ReplyDelete
  6. kharech kaay lihites g
    mala khup avadali kavita
    kavita vachalavar mala mazi sakhi
    athavali
    khup lihi g
    tuze hardik abhinandan

    sandeep

    ReplyDelete
  7. >>
    ती तीच पुन्हा स्वप्ने सारी रमणार नव्या डोळ्यांत जुनी
    त्या तश्याच विव्हल सुरांसवे शोधीत कुणा फिरणार कुणी
    >>

    Wah! Kya baat hai...

    ReplyDelete
  8. Swati,
    Far sundar kavita ahe..
    Sagar

    ReplyDelete