Wednesday, May 2, 2007

थांग

या खा-या पाण्याचा थांग लागणं
अशक्यच आहे.. कुणालाच..
केवळ माझ्या कवेत आहे
म्हणून माझं म्हणता येईल का?
कोण जाणे..
उमाळे खोटे नाहीत त्याचे,
पण हे असं लाटेलाटेने येऊन जितकं भिजवेल
तितकेच आम्ही एकमेकांचे..
बाकी..
त्याच्या पोटातली खळबळ त्याच्याकडे
आणि शिंपल्यांत जपलेल्या आठवणीच तेवढ्या माझ्याकडे..

11 comments:

Sthiti Chitra said...

खासच!
(समुद्राला म्हणे 'अथांग' म्हणतात!)

Sthiti Chitra said...

तू वास्तवाला किती सुंदर करून सादर करतेस!

Anonymous said...

ह्या गुडी-गुडी, हळव्या, मुलायम कविता ठीक आहेत. छानच आहेत... Greeting card poetry... पण तुम्ही यापेक्षा 1000 पट छान लिहू शकता. Perhaps, you don't know your promise. Live up to it.

Vidya Bhutkar said...

malaa aavadali..khup avadali, sahaj,sopi tarihi chaan aahe. :-)
-Vidya.

माणिक जोशी said...

'थांग' खरच अथांग आहे स्वाती !
प्रत्येकजण आपापल्या परीने अर्थ घेऊ शकतो यातून !
खूपच सुंदर रचना !

अश्विनी सातव said...

शेवटची ओळ एकदम खास!

Anonymous said...

sunder

जयश्री said...

वाह!!

Anonymous said...

शेवटच्या दोन ओळी खास आहेत. तुमच्या कविता छान असतात! :-)

Meenakshi Hardikar said...

हं खासच गं ..

माणिक जोशी said...

मस्तच ! व्वाह !