Wednesday, May 9, 2007

रहस्य

काही असेही दिवस असतात
की माती पांघरून
निवांत रुजत असतो आपण
ऊन म्हणतं, प्रतारणा केली
पावसाला वाटतं, फसवणूक झाली..

आणि काही असेही दिवस असतात
की पानाफुलांनी लगडून येतो आपण
पण तोवर ऊनतरी भडकायच्या बेतात असतं,
किंवा पाऊस तरी झोडपायच्या..

असं झालं तर
शहाणपणानं तापल्या झुळुकांच्या नावे करायचा सुगंध
पावसात वाहवून द्यायचे आपले अमृताचे पाझर..
मात्र हळूच
दोघांचाही डोळा चुकवून
मातीच्या पोटी दडवून टाकायचं रुजण्याचं रहस्य..

फार तर काय होईल?
ऊन म्हणेल प्रतारणा केली..
पावसाला वाटेल फसवणूक झाली..

14 comments:

  1. "शहाणपणानं तापल्या झुळुकांच्या नावे करायचा सुगंध
    पावसात वाहवून द्यायचे आपले अमृताचे पाझर..
    मात्र हळूच
    दोघांचाही डोळा चुकवून
    मातीच्या पोटी दडवून टाकायचं रुजण्याचं रहस्य.."

    Wowwwwwwwww...what a thought. :-)) I dont know how you can imagine/think/write this good and different. :-) I liked it very much.
    -Vidya.

    ReplyDelete
  2. अभिप्रायासाठी शब्द सुचले नाहीत , कदाचित माती पांघरून बसले असावेत....

    ReplyDelete
  3. fantastic. tujhee sarvaat jaast aavaDalelee kavita (aattaaparyant:-))

    ReplyDelete
  4. आई ग!
    काय लीहीता तुम्ही लोक खरच!
    शब्द नाहीत

    ReplyDelete
  5. खूप दिवसांनी इथे आले.फारच उच्च कविता वाचायला मिळाली.

    ReplyDelete
  6. वा!!अप्रतिम
    काही दिवस असेही असतात
    उन्हं आणि पाऊस आणि आपण ह्यांतल्या फरक मातीला कळत नाही.

    ReplyDelete
  7. Amazing!!! काय दाद द्यावी हेच कळत नाहीये...........Terrific!!
    तू लिहित रहा गं.....इकडे नुसतं वाचूनच धुंदी, नशा चढतेय!!

    ReplyDelete
  8. स्वाती सुंदर गं!!
    फार तर काय होईल? मस्त वाटतय वाचायला ..

    ReplyDelete
  9. अश्या कवितांना शब्दांनी दाद देऊ नये म्हणे !

    ReplyDelete
  10. अप्रतिम...
    Sorry, खूप उशिरा reply दिलाय...
    पण मी आत्ताच वाचली...

    खूsssssssssssssssssप आवडली, भावली..

    ReplyDelete
  11. paarijaat amach awadat nav tumachya blog la ahe.. :) kawita chan ahe.. :)

    ReplyDelete