का असा चिडून रोज अंत बघतेस माझा?
राधे, मी तुझाच गं.. फक्त फक्त तुझा!!
(काय आहे..)
रुक्मिणीचा प्रॉब्लेम होता भावाबरोबर घरी
सत्यभामा कटकट करते.. आधी होती बरी
बाकी सोळा हजार नुसती शरणार्थी प्रजा..
राधे, मी तुझाच गं.. फक्त फक्त तुझा!!
हेल्थ रीझन्ससाठी तुळस.. अं.. पित्त शमवायला..(?!)
ओठांवर मुरली धरली तुझंच मन रमवायला
रासक्रीडा? मी?? छे!! क्लोन असेल माझा!
राधे, मी तुझाच गं.. फक्त फक्त तुझा!!
भोळाभाबडा सापडलो म्हणून अशी रुसतेस!
तूच खरी अनयासोबत आनंदात दिसतेस!!
जीव तोडून प्रेम केलं त्याची ही सजा??
राधे, मी तुझाच गं.. फक्त फक्त तुझा!!
Aashi hi patwa patwi.( Ask my wife)
ReplyDeleteWa Swatibai, Bathiya hai.
Also do not forget Bhole Shankar,
Sar pe dhari Gang.
:) सहीच आहे!
ReplyDeletemastach aahe. :-) khupach avadali.
ReplyDeleteVidya.
hehehe sahiii aahe!
ReplyDeleteकाय पण समजुत घालण आहे :D
ReplyDeleteम्हणे तुझाच ग तुझा....
गोSSSSSSड एकदम :)
कसं काय सुचतं तुला असलं?
ReplyDeleteकमाल आहे यार! Really great!
काय मस्त लिहिलेस ग!
ReplyDelete:) कसली गोड आहे!
ReplyDeletekhup aavadale !!
ReplyDeleteझकास . सही जमलीय
ReplyDeletegoD aahe [:)]
ReplyDeleteTHE MORE I READ MORE I ENJOYED फक्त तुझा!!
ReplyDelete"The Clone." Very innovative
"Rukhmini","Tulsi" "Sola Haazar" Perfect analysis.
What a good play with the words.
एकदम गोड कविता गं :)
ReplyDeleteखरंच मुली कशाही पटतात ना...!
मस्त!झकास!
ReplyDeleteस्वाती,
ReplyDelete:)
ग्रेट!!!!!!!