Wednesday, January 24, 2007

मुक्ती

हे असं तिळ तिळ तुटणं काही खरं नाही..
घाव कसा सपकन झाला पाहिजे..
पातं कसं अधिकच लखलखून बाहेर आलं पाहिजे..
त्याला हे असे
काही ओलसर श्वास.. काही चुकार भास..
चिकटून येता कामा नयेत..
त्यावरून गळू नये अद्याप उष्ण असलेला एकही थेंब..
कारण मग तिथेच ती अदृष्य आशाही असते माखलेली..
पुन्हा सांधलं जायची..

अरे, नीट जोडता आलं नाही इथवर ठीक होतं..
नीट तोडताही येऊ नये...???

15 comments:

सारंग पतकी said...

वा! वा!!

अरे, नीट जोडता आलं नाही इथवर ठीक होतं..
नीट तोडताही येऊ नये...???

खास आवडलं...

स्नेहल said...

swati, su.ndar... dusare shabda nahit.

पूनम छत्रे said...

हे असं तिळ तिळ तुटणं काही खरं नाही..
घाव कसा सपकन झाला पाहिजे..

ekdam paTesh!
kharay..

Yogesh said...

सुंदर कविता

वैभव जोशी said...

झकास . एकदम झकास

Kamini Phadnis Kembhavi said...

व्वा!!
इकडेही टाकलीस ते बर केलस ,तुझ्या कवितांमधली अतीशय आवडती कविता आहे ही माझी
जीओ...:)

Sumedha said...

too good!

जयश्री said...

अहा.......एकदम सपकन्‌ ..........क्या बात है!

Gayatri said...

अव्वल!

प्रिया said...

Too much आहे ही!

माणिक जोशी said...

पुन्हा पुन्हा वाचतोय..!
प्रत्येक शब्दाला एक निराळीच धार आहे... तीही तीक्ष्ण !
जियो...!

Meghana Bhuskute said...

bhannat.

Unknown said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

marmik ahe!

Pooja said...

काय अशक्य लिहिले आहे !!
नीट जोड़ता आला ठीक आहे पण नीट तोड़ता ही येऊ नये..
bhari ahe...sahi!!