Saturday, January 27, 2007

शून्य

ते समोर झाड दिसतंय?
त्यात लपून रोज पहाटे एक पाखरू गायचं..
अलवार सुरांतून रोज आव्हान द्यायचं..
'बोल, मी दिसलो नाही म्हणून मी नाहीच आहे असं म्हणशील??'
मग दिवसरात्र छळायचे
ते सूर.. ते प्रश्न..
शेवटी एकदा मी चिडून त्याला म्हटलं
'नाहीयेस..! नाहीच आहेस तू..!!
असतास खरंच तर दिसला नसतास?
एकदा तरी? चुकून तरी??'

तेव्हापासून
सगळं शांत शांत आहे इथं..
सूर छळत नाहीत.. प्रश्न पडत नाहीत..
सूर्य उगवतो रोज,
पण दिवस उजाडत नाहीत...

10 comments: